सोलो ट्रिप
नमस्कार मित्रांनो ,
जसं मी सागितलं होत माझ्या ब्लॉग मधे तुम्हाला कधी माझे travelling experience पण वाचायला भेटु शकतात, तर मी आलोय अश्याच एका अनुभवा सोबत.
माझी सर्वात पहिली सोलो ट्रीप...........
मी आठव्या वर्गात शिकत होतो, आज जसा आहे त्याच्या पेक्षा खूप वेगळा,शांत,आपल्याच कामाशी काम असलेला खूप सादा आणि सरळ कुठल्याही गोष्टीवर खूप विचार करणारा ,पण जी गोष्ट अजून बद्धली नाही ती म्हणजे माझा पाककृतित असलेली आवड.
4 नोव्हेंबर 1992,माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस लहान पणा पासून आमच्या दोघा मधे खूप वेगळा पणा आहे. तुम्हाला ते आता ही माझ्या कडे आणि त्याचा कडे बागितल की लगेच कळेल .त्याचे ते सिक्स पॅक्स आणि माझा फॅमिली पॅक.
4 नोव्हेंबर 2008 ,मी माझ्या मोठ्या भावा साठी केक बनवण्याचा भेत रचला, ११ am ते 5 pm हा माझ्या शाळेचा वेळ. मी ठरवलं केक 11 वाजेच्या आत bake करुण शाळेत जायच, माझ time management तस फारस काही बर नव्हत केक बनवता बनवता 12 वाजुन गेले.....
आई घरी आली, तिने जस मला घरी बगितल तिचा पारा चडला. आणि एक गोष्ट म्हणजे बायांच जेवढ प्रेम आपल्या घरच्यांवर असत ना त्या पेक्षा कही जास्तच आपल्या स्वयंपाक घरा वर असत........तिने काहीही न विचारता मला चप्पले खाली बदाड न सुरु केलं, आणि ती रागात बोली "शाळेत गेला नाहीस ना मंग आता हॉटेल वर जा, आणि आयुष्यभर तिथेच काम कर ....जा" (माझ्या घरी हॉटेल आहे...).
मी विचार केला आई नेच मला एवढा मारला तर दादा (आमच्या घरी वडलाला दादा म्हणतात) तो विचारच नको.तर आता काय करायचं ???? म्हणून मी सायकल कडली आणि विचार करत असताना मला माझ्या अत्या ची आठवण आली कारण आत्या च्या पुढे कोणी बोलेल तर शपथ, पण ती माझ्या वर खूप प्रेम करते.माझा कुठलाही अगदी कुठलाही गुन्हा तिच्या नन्यायालयात सादर केला की तो गुन्हा राहतच नाही
मी माझी सायकल आणि ४ रुपये ......................................
माझ्या आत्याच गाव ( देऊळघाट ) हे माझ्या गावा पासून ३३ Km येते आता जायचा तर विचार केलाय पण खिशात फक्त ४ रुपये, बस च भाड ३५ रुपये। आता काय?? माझ लक्ष माझ्या सायकल कडे गेलं आपण रोज 3 Km ते ४ Km प्रवास करतो आणि येणं जाणे ६Km ते ८ Km अश्या आपल्याला आता फक्त ५ ते ६ पट जास्त सायकल चालवायची आहे बस...
नोव्हेंबर आताच सुरु झाला होता पाऊसाळा संपत आला होता , धरती माते ने हिरव पातळ नेसलेला असावा अस काहीस मला भाचत होत त्या दिवशी माझे डोळे अगदी सहज पणे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा टिपून घेत होते,आता मी सायकल चालून खूप थकलो होतो परत जाण्याचा विचार आता माझ्या मनात घर करणार मला लगेच आई ची चप्पल आठवली "नाही आपल्याला जायलाच हवं" असा गंभिर आवाज माझ्या मनातून आला.
त्या दिवशी मला कळलं की ह्या जगात भिती पेक्षा चांगली अशी कुठलीच गोष्ट नाही की जी आपल्याला (Motivate) उत्साहित करू शकेल, तुम्हाला जर एखादी गोष्ट हरवण्याची कीव्हा ती गोष्ट नाही झाली तर तुमच्या आयुष्यात काय वाईट बदल घडणार आहे याची कल्पना असेल तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टी साठी आख्या जगाशी झुंज देऊन तिला मिळवण्याच्या प्रयत्नात असता.........
आता मला खूप भूख लागली होती जसा जसा मी सायकल चालवत होतो माझ्या पोटातील कावळे जोराने ओरडत होते 'कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में लग जाती है' आणि मला भेटली, हा डायलॉग जेव्हा मी पहिल्या वेळेस एकला तेव्हा मला माझ्या याच अनुभवाची आठवण आली मी आता थकून सायकल लोटत होतो मला एक मंदिर दिसल तिथे खूप गर्दी जमली होती, वाळवंटातल्या प्रवाश्याला पाणी मिळावं तस मला ते मंदिर मिळाल ते मंदिर मारुतीची होत आणि तिथे भंडारा चालू होता मी दर्शन न घेता जेवायला बसलो आणि जीव तृप्त होय पर्यंत जेवलो.
मी दर्शन न घेता जेवलो हे एका कट्याल अवडल नसावं ,माझी सायकल पंक्चर झाली। आता काय ???? मी एका वृद्धव्यक्तींना विचारल तर त्यांनी सल्ला दिला पुढेच काही Km वर दुकान आहे मी सुटकेचा श्वास सोडला पण अजून एक अडचण होती पैसे माझ्या कडे फक्त ४ रुपये होते..............(नशीब त्या चार रुपयात माझं काम झालं)
आता मी आत्या कडे पोहचलो तिने आईला कळवल, आता मी निश्चिंत झालो आत्या ने मला चहा दिला आणि मी असाच दारात जाऊन बसलो माझं लक्ष वेधून घेतल ते एका गुलाबाच्या रोपट्याने,काही फुलांना काटे टोचत होते आपल्या आई वडलाच सुद्धा असच असतं आपण हाता बाहेर गेलो ते टोचतात पण अपल रक्षण पण करतात .......................
घरी गेल्यावर जे झाल ते...........................................................#NUSTACHOPLA........
I was the first to listen this story😁😁😁
ReplyDelete#jabardast
sahi bat heeee
Deletethank u keep supporting
Nice explaining your story in beautiful words
ReplyDeletethank u
Deletekeep supporting........................
भारी न हो
ReplyDeletedhanyawad dada
DeleteSuch a nice story..!
ReplyDeletethank u pratik.....
Deletekeep supporting
👍
ReplyDeletethank u ,keep supporting
DeleteSolo trip ....👍👍
ReplyDeletethank u swati keep supporting ..............
DeleteMg ghari aatya ni ky samjun sangitl? Ani cake ksa banla hota????
ReplyDeleteatyani barach sangitl te ekhadya dusrya blog madhe
Deleteani cake mi test nahi kela ...............