काही शब्द

काही शब्द






नमस्कार  मंडळी 
                            
                    एखादया  दगडावर  कोरीव  काम कराव आणि  ते  वर्षाणु  वर्षे   तसच  असाव . ह्याचं जिवंत उदहारण  म्हणजे अजिंठा आणि वेरूळ च्या लेण्या , असच  काहीस असत आपल  मानवी शरीर ,तो  दगड  म्हणजे आपल काळीज  आणि  त्या  वरच  कोरीव  काम म्हणजे  कही शब्द 
                      
                    माझ्या दगडावर  सुद्धा  अस  बरच  कोरीव  काम  झालय .त्याच  कामा  पैकी ऐक जे लपल  होत  कुठल्या  तरी  कोपऱ्यात ,माझ्या  दगडावर  होणाऱ्या  बऱ्याच  कोरीव  कामाच्या  तिव्र  वारांच्या  मागे  ; काही  दिवसा  अगोदरच  मि  त्या  कोरीव  कामाला  बघितल ,अनुभवल ,जगलो  तेच  कोरीव  काम मि आज तुम्हच्या सोबत जगणार आहे  ... 
                     
                                                तसा मि स्वभावाने खुप मन मिळावु आणि खोडकर वृत्तिचा आहे .आणि हो ,ते फक्त माझ्या मित्रपरिवारासाठी .हेच जर तुम्ही माझ्या नातेवाईकांना विचाराल तर मि सभ्यपणाच उदहारण बनू शकेल . एखादा म्हशिवर बसलेला बगळा की ज्याच अस्तित्व सुद्धा त्या म्हशिला माहीत नसत ,तसा मि माझ्या नातेवाईकांमध्ये वावरतो .जेवढ होऊ शकेल तेवढा मि त्यांना टाळतो .
                      
                      माझी सर्वात मोठी चुलत आत्या ,तिच्या सोबत मी लहानपणी खूप खेळायचो,राहायचो,तिचे ते शब्द . माफी असावी ,आपल्या आजच्या ब्लॉग च्या शब्दात कोरीव काम .जे माझ्या दगडा वर झाल...

                          माझ्या आत्याच्या घरी ते सर्व पाच लोक आहेत  - आत्या ,मामा, त्यांचा मुलगा, सून आणि त्यांचा नातू .मी गेले १० वर्ष माझ्या आत्या ला भेटलो नव्हतो ,त्या दहा वर्षात खूप काही बदललं होत. आत्या चा मुलगा एका अपघातात मरण पावला, आता ते फक्त चार लोक आहेत .
                    
                      दहा वर्षां नंतर योग आला तिच्या घरी जाण्याचा ,आपला एकुलता एक मुलगा गेल्या वर आई ची काय परिस्थिती होते ते मला त्या दिवशी कळाल  .कधी काळी शेतातील सर्व काम करणारी, पट्टीतल पोहण असणारी ,तिच्या शरीराच्या नसा नसा मध्ये ऊर्जा असणारी ;हो असणारी . कारण मी जेव्हा तिला भेटलो तेव्हा ती एका बाजी वर झोपून होती .

                       मी तिला उठवल मी तिला आवाज दिला तिने विचारल, कोण आहे ? मी तिला सागितलं "दीपक " आता तिच्या ऐकण्याची क्षमता सुद्धा कमी झाली होती .तिच्या त्या (expression) वाकप्रचारणे  मला लगेच कळाल ,मी आता थोड मोठ्याने सागितलं "आत्या मी दीपक, दीपक ढोले "आणि आत्याच उत्तर होत  "येड्या मायाच्या " हे वाक्य हे दोन शब्द एकूण मला आता १३ ते १४ वर्ष झाले असतील ,पण हे शब्द हे कोरीव काम जस माझ्या कानावर पडलं .
                                   
                           माझ माझ्या आत्या सोबत च लहानपण माझ्या डोळ्यासमोर, एखादा चित्रपट सुरू असावा असं दिसतं होत .येड्या मायच्या ह्या आत्या च्या बोलण्यावर मी नेहमी तिला उत्तर द्यायचो "येड्या मायचा नाही येड्या अत्याचा आहे मी "हे उत्तर अर्थातच त्या दिवशी पण मी तिला देल ,आता तिचे डोळे भरून आले आणि तिच्या मनातून निघालेले शब्द पुन्हा माझ्या दगडावर कोरीव काम करून गेले आपल्या लेकरांच्या जिवा साठी मायच येडी असते रे  !

                             असा असतो काही शब्दांचा अर्थ त्यांची जादू त्यांचा प्रभाव ..........

                                  कदाचित  माझं  उत्तर  तिच्या  दगडावर  कुठेतरी  कोरल्या  गेल  असावं ,म्हणूनच  मला  तिच्या  डोळ्यात वाहणारा तो सागर  दिसला .  
                                                         तिला  सुद्धा  त्या  सर्व  गोष्टी  आठवल्या  असतील  का ? 
मला  वाटतंय नक्कीचं  आठवल्या  असतील ................................


                          comment मध्ये  सांगा  तुम्हच्या दगडावर  झालेलं  कोरीव काम . 

Comments

Contact us

Name

Email *

Message *